Search
  • leena dhawan

Strong boys don’t cry! ... खरंच?

Updated: Feb 7
“रडू नकोस बरं.. तू strong आहेस ना? मग चला डोळे पुसा आणि हसून दाखव बघू” - घसरून पडला म्हणून स्फुंदून स्फुंदून रडणार्याचार वर्षाच्या अन्वयला किर्ती समजावत होती. लग्नाच्या हाॅलच्या त्या पाॅश लाॅबी मध्ये तिला खूपच awkward वाटत होतं पणअन्वयचं रडणं काही थांबत नव्हतं. ती पुन्हा पुन्हा अन्वयला तो कसा खूप शहाणा आणि strong मुलगा आहे वगैरे वगैरे समजावतहोती... आणि अन्वयचा सूर चढत होता.

जवळच उभ्या मेघनाच्या कानावर हे सगळं संभाषण पडत होतं आणि किर्तीची तारांबळ ती observe करत होती. आणि तिच्यानकळतच तिचा स्वत: शी संवाद सुरु झाला होता...का बरं रडण्याला ... especially मुलांच्या रडण्याला नेहमी कमकुवतपणाचं लेबललावलं जातं? अश्रूंद्वारे भावंनांना वाट मोकळी करून देण्याचे वरदान आहे मानवाला, ते काय त्याला कमकुवत सिद्ध करण्यासाठी कीमोकळं होण्यासाठी... व्यक्त होण्यासाठी. आणि अशावेळी हवा असतो तो धीर देणारा खांदा, एक प्रेमळ स्पर्श ... विचारपूस करणारा.. काय खुपतंय ते विचारणारा...”आहे मी तुझ्याबरोबर” म्हणून आश्वस्त करणारा आणि रडण्याला judge न करणारा.

आईचं हे साधं gesture त्या मुलासाठी आयुष्यभराचा संस्कार असतो.....भावंनांना मुक्तपणे व्यक्त करण्याचा..अश्रूंना कमकुवत नसमजता, ते पुसण्याचा आणि त्यामागचं कारण जाणून घ्यायचा प्रयत्न करण्याचा...आपल्या खांद्यावर विसावणार्याचा विश्वास सार्थठरवण्याचा.

मेघना न राहावून किर्तीजवळ गेली... “ काय झालं गं .. इतका का रडतोय? “ तिने विचारलं

“काही नाही गं.. तो खूपच sensitive आहे. जरासं लागलं की रडतो. मला तर त्याची काळजीच वाटते. “ किर्तीने सारवासारव केली, अन्वयला त्याच्या बाबांकडे दिले आणि ते दोघे आत गेले.

किर्तीच्या चेहर्यावरची काळजी मेघनाने चटकन् टिपली आणि ती म्हणाली- “ अगं गेला तो.. हस बघू आता.. come on be a strong mom”

किर्तीने चमकून तिच्याकडे पाहिलं आणि कसंनुसं हसली.

“ I sounded stupid right? तू वेगळ्याच track वर असताना मी सारवासारव करतेय असं वाटलं ना? अशा व्यक्तींशी तुझ्या भावनाshare कराव्याशा वाटतील तुला?” मेघना किर्तीच्या नजरेला नजर देऊन म्हणाली.

“ रडणारा किंवा sensitive असणारा weak नसतो; पण आधार देणारा मात्र खूप strong असतो.”

किर्तीला भावना पोहोचल्या होत्या.

“Thanks मेघना” - ती म्हणाली आणि तिची पावलं अन्वय कडे वळली.


13 views0 comments

Recent Posts

See All