Search
  • leena dhawan

Sharing is INDEED caring

कालच एक survey पाहिला (link 1 shared in comments ) आणि त्यात आढळलेले काही धक्कादायक facts मी पुढे share करतेय.

2021 मध्ये USA मधे झालेल्या 11000 मातांच्या survey नुसार (यांतील 5809 माता ह्या 25-40 ह्या वयोगटातील होत्या) 93% मातांना कोरोना काळातील समस्यांमुळे... उदा. work from home, home schooling, घरातील इतर जबाबदार्या ह्यांमुळे आत्यंतिकताणाचा अनुभव येत आहे. अनेक स्त्रियांना करिअर आणि काम ह्याची सांगड घालणे कठीण पडत आहे.

सामान्यतः वर उल्लेख केलेली सर्व कामे मुख्यत: आईने करावीत असा असलेला “प्रचलित समज” हे ह्यामागचे एक मुख्य कारण म्हणतांयेईल.

भारतातील परिस्थितीवरही LinkedIn ह्या social media channel ने, ॲागस्ट 2020 मधे 2254 professionals चा survey केलाहोता. ह्या survey नुसार ....

  1. 47% स्त्रियांमधे कोरोनाकाळात अतिरिक्त मानसिक ताण अनुभवला गेला vs पुरुषांमधले त्याचे प्रमाण 38% इतके होते

  2. Deadline पूर्ण करण्यासाठी 44% स्त्रियांना वाढीव वेळ देऊन काम करावे लागले ... पुरुषांमधे ह्याचे प्रमाण 25% होते

  3. 20% स्त्रियांना मुलांची काळजी घेण्यासाठी मदत उपलब्ध होती .. 32% पुरुषांना ही मदत मिळत होती

दोन्हीही surveys मधे एक गोष्ट प्रामुख्याने आढळून आली ... ती म्हणजे... समाजाची मानसिकता अजूनही मूल ही मुख्यत्वे आईचीजबाबदारी मानते; मग भले तीही working parent का असेना!

Sapien - a brief history of humankind ह्या पुस्तकात आणि इतरही अनेक पुस्तकांत असा उल्लेख आढळतो की, पुरूषांमधेअसलेल्या शारिरीक क्षमते मुळे शिकार आणि इतर बाहेरची कामे ही पुरूषांची जबाबदारी होती. स्त्रिया शेती आणि कुटुंबाची जबाबदारीपार पाडत होत्या.

कालपरत्वे, जेव्हा ह्या कामाच्या विभागणीत फरक पडला आणि कोरोनाकाळात जेव्हा दोघेही घरून काम करत आहेत; तेव्हा ह्या age old असलेल्या कामाच्या विभागणीतही फरक पडला पाहिजे. पण unfortunately तसं होऊ शकले नाही.

It’s time we should take this seriously. कामांची, जबाबदार्यांची विभागणी फक्त त्या एका स्त्री ची मदत करत नाही तर येणार्यापिढीसमोरही एक आदर्श ठेवते.

आजकाल मुलांच्या शाळेत जेव्हा lifeskills शिकवतात ते बघून खूप बरं वाटतं. Fireless cooking करताना, स्वत:ची खेळणी धुवूनलख्ख करताना, कपड्यांच्या घड्या घालताना कुठेतरी हे समानतेचं, गृहकृत्यदक्षतेचं बीज मुला-मुली दोघांतही रुजत आहे ह्याचा आनंदहोतो. आणि तेवढंच नाही तर ही मुलं घरातल्या मोठ्यांना सुद्धा स्वत:मधे बदल घडवायला भाग पाडतात.

तेव्हा कालाय तस्मै नम: म्हणूया आणि जो बदल बघू इच्छितो त्याचा भाग होऊया

Let’s start saying No when u really can’t .. lets share the load... let’s have “me time


0 views0 comments

Recent Posts

See All