Search
  • leena dhawan

Mask

HPV किंवा Cervical cancer ( गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर) vaccine च्या एका नामांकित ब्रॅंडची marketing lead म्हणून मीभारतीय स्त्रियांच्या behavioral pattern चा अभ्यास करणारे अनेक market research उपक्रम राबवले आणि देशभरातील अनेकनामांकित स्त्री- रोगतज्ञांशी आणि बालरोगतज्ञांशीही त्याबद्दल बोलले.तेव्हा एकूणच आपल्याकडच्या स्त्रियांची आरोग्याबद्दलचीनिरास्था बघूनआश्चर्य वाटलं. एक लस; जी स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारा कर्करोग प्रतिबंधित करू शकते आणि तरीही ती घेतानाज्याप्रकारची हेळसांड किंवा ज्याप्रकारची नकारात्मकता दाखवली जाते, ते बघून खिन्न वाटायचं. हजारो रुपये फोनवर, दागिन्यांवर, कपड्यांवर खर्चकरताना जराही मागेपुढे न बघणारे आपण, शरीरासारखा अनमोल दागिना जपताना इतके निष्काळजी का असतो? Gynecologists म्हणायचे, “ लस घ्या सांगितल्यावर स्त्रियां नवर्याचा, घरच्यांचा सल्ला घेतात आणि अनेकवेळा त्यामुळे हा निर्णयपुढे ढकलला जातो, किंबहुना कधी घेतलाच जात नाही”.

आमच्या research वरून कळले की भारतीय माता जरी स्वत: ची हेळसांड करत असल्या तरी मुलींच्या लसीकरणाची काळजी मात्रत्या अगदी जातीने घेतात. मग त्याप्रमाणे strategy वगैरे discuss झाली आणि ते workshop संपवून flight मध्ये बसले.

काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटत होतं. मी काही feminist वगैरे आहे असं अजिबात नाही, पण ही गोष्ट काही माझ्यामनातूनजाईंना. एकीकडे समानतेचा आग्रह धरणार्या आणि समाजाकडून, सरकार कडून त्या समानतेची अपेक्षा करणार्या आपण स्त्रियाकुठेतरीखूप मोठी गफलत करत आहोत असं वाटू लागलं.

जेव्हा केव्हा मी अशी एकाकी विचारात असते तेव्हा माझ्या मनांत बर्याच संलग्न/ असंलग्न गोष्टी फेर धरतात. अशीच एक जुनीआठवणजागी झाली. माझ्या पहिल्या मार्केटिंग assignment च्या वेळची गोष्ट बरं का! आमचा review चालू होता आणि तोहीCEO बरोबर... त्यामुळे वातावरण जरा तंग होतं. Present करणारा आपण कसं सगळं योग्य केलं आहे आणि supporting teams कशा अयोग्य आहेत वगैरे वगैरे (खूप subtle पणे) सांगत होता. मध्येच CEO ने presentation थांबवलं.. brand manager म्हणूनसगळेच नवखे होतो त्यामुळेpresenter सहित सगळेच बावरले.... seniors ही जरा सावरून बसले.

त्यानंतर जे त्या CEO ने सांगितले ते आजपर्यंत माझ्या लक्षात आहे...

तो म्हणाला, “ start saying - I am Responsible. तुला बदल घडवणं खूप सोपे जाईल. जगाला बदलण्यापेक्षा आपलं वागणंआणिदृष्टिकोन बदलणे कधीही सोईस्कर असते”

त्यांनी सांगितलेले हे अनुभवाचे बोल मला व्यावसायिक दृष्टया मोलाचे ठरेलच पण वैयक्तिक दृष्टया सुद्धा वेळोवेळी मला त्याचाप्रत्ययआला.

आणि म्हणूनच असं वाटलं की, घराची, कुटुंबाची आणि मुलांची काळजी घेताना सहजपणे स्वत:ला दुय्यम स्थान देणार्या स्त्रियांना नमिळणा-या समान हक्कासाठी, स्वत: स्त्रियांच मुख्यत्वे जबाबदार नाहीत का?

सगळ्यांच्या ताटात गरमागरम वाढण्याच्या नादात स्वत:च्या जेवणाच्या गारगोट्या करणार्या अन्नपूर्णेवर... आपल्या आवडीनिवडीअगदीअलगद बाजूला सारून मुलांच्या आनंदासाठी मात्र सढळ हस्ते खर्च करणार्या लक्ष्मीवर....

आणि कुटुंबामागे धावपळ करताना स्वत:ला दुर्लक्षून osteoporosis, aneamia इत्यादी सारख्या रोगांचे शिकार

होणार्या दुर्गेवर हसावे की रडावे हेच मला कळत नाही

ज्या दुर्गेची मनोभावे पूजा करतो तिच्या रुपाकडे पुन्हा एकदा निरखून बघूया... ती सतेज आहे... सुदृढ आहे...सबळ आहे... सर्वशस्त्र-विद्यांमध्ये पारंगत आहे. तिच्या चेहर्यावरचे समाधान आणि आत्मविश्वास मनाला भिडणारे आहे. आणि अशी कन्या, अशी आई, अशीपत्नीच घरात खरा आनंद घेऊन येऊ शकते.

म्हणूनच इतरांची काळजी घेण्याबरोबर नव्हे तर “घेण्याआधीच” स्त्रियांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यागाची “मूर्ती” बनण्यापेक्षा आरोग्याचा, ज्ञानाचा, स्वयंशिस्तीचा “ चालताबोलता” आदर्श बनणे कधीही श्रेयस्कर नाही का?

हे सगळे विचार झरझर कागदावर उतरवत होते आणि flight attendant ची announcement कानावर पडली- “ During emergency wear your mask ‘first’ before helping others “

मनांत म्हटलं “ I certainly will”

येत्या नवीन वर्षात #selfcare चा हा mask स्वतःला सर्वप्रथम लावायला तुम्हीही विसरू नका.


21 views0 comments

Recent Posts

See All