Search
  • leena dhawan

Home minister


“Share your field work plan for the month” बॅासचा mail आला आणि तो बघता क्षणीच oh god !!! Not again म्हणतमाझ्या पोटात मोठ्ठा गोळासुद्धा आला. आता घरी काय सांगू .. की बाॅस शी बोलू ? Last field work कधी केलं होतं ? असे अनेकप्रश्न मनांत फेर धरू लागले. Fieldwork ची गरज मला स्वत: ला सुद्धा जाणवत होती त्यामुळे बॅास बरोबरच्या discussion ला काहीअर्थ नव्हता; पण मुलं, घर ह्यामुळे पहिल्यासारखी flexibility राहिली नव्हती. आणि खरं सांगायचं तर मलाच guilty वाटत होते.... 3-4 दिवस मुलांपासून दूर राहणार म्हणून ... घरच्यांची गैरसोय होणार म्हणून. पण field work ला जावं तर लागणारच होते त्यामुळेआता घरी काय आणि कसं सांगायचे यासाठी शब्दांची जुळवाजुळव करत होते.... तेवढ्यातच जाणवलं की आजूबाजूस काहीतरीजोरदार discussion सुरू झालेले आहे. वळून पाहिलं तर शैली( माझीcolleague ) नम्रताला ( senior colleague ) तिच्याtravel बद्दल विचारत होती. “कैसे manage कर लेते हो आप ma’am ? Travel, kids, family ... problem नही होता ? Guilty नही लगता?? “... “हो जाता है manage!! “नम्रता हसतच बोलली... पण शैली ची प्रश्नांची सरबत्ती चालूच होती. शेवटी नम्रतावैतागली.... I tell you something... I don't mind travelling. It makes me a better person. Because that's when I get some space for myself... I can order food of my choice and don't have to cook.... I can relax at as early as 8 pm, which is impossible if I am at home .... I can watch my favourite tv shows without any interruptions ... I get ready at ease... I can talk to my friends... माझे ते - दिवस खूप छान जातात आणि नंतरमला सुद्धा घरची ओढ लागते. So when I am back home मी खूप शांत आणि fresh असते. मुलांना सुद्धा थोडा change मिळतो ... भरपूर बाहेरचं order करून झालेलं असतं आणि त्यांना सुद्धा आता माझ्या हातचं खावंसं वाटतं. नवरा सुद्धा miss करूलागतो.. एकूणच काय सगळं आलबेल असतं. We all need some space from each other. It’s okay to give and get that space and hence I am not guilty!!!

नम्रताचा “guiltfree” राहण्याचा नुस्खा मी काही वर्ष आजमावून पाहिला आणि त्यात काही अंशी successful सुद्धा झाले. नंतरअशाच एका business trip वर असताना घरी फोन केला.. आणि surprisingly मुलं normal tone मध्ये बोलताना बघून वाटलं ..अरे!! काहीच फरक पडला नाही का माझ्या नसण्याने?? त्यांचं ते normal वागणं मला खूप disturb करून गेलं आणि आता मलाएका वेगळ्याच guilt ने ग्रासलं. खूप विचार केला तेव्हा एक मेख ध्यानात आली आणि माझ्या दुटप्पीपणाचं मलाच हसू आले.

Guilt किंवा अपराधीपणाची भावना स्त्रियां मध्ये प्रामुख्याने बघावयास मिळते आणि माझ्यामते त्यांची control freak वृत्ती किंवात्यांचे lack of delegation हेच त्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे.

पोळ्या मीच उत्तम करते... भाजी मीच व्यवस्थित निवडून आणते....कामवाल्या मावशी कुठे काय नीट करतात , मीच त्यांच्याकडूनकरवून घेते... घरातल्या वस्तू सगळ्यांना अगदी हाताशी मिळतात कारण मीच सगळं नीट ठेवते. मी नसेन तर सगळ्यांनाinconvenience होतो आणि ही गोष्ट मला कुठेतरी सुखावते. सगळ्या generations च्या स्त्रियांमध्ये थोड्याफार फरकाने हेbehavior दिसून येते. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट विसरली जाते ती हीच की ... super mom ... super women will always be super tired . आणि मग येतो तो चिडचिडेपणा आणि stress

पुन्हा इथे मला एक office मधला किस्सा सांगावासा वाटतो, कारण मी माझ्या management learnings ना नेहमीच personal आयुष्याशी correlate करते. मला नेहमीच असं वाटतं की घर आणि office manage करण्यात फक्त technique चा फरकअसतो पण people management चे मूळ principle तेच असतं.

एका brand launch presentation वर माझी team काम करत होती. Presentation च्या final cut वर boss नेcomplement दिली आणि म्हणाला “so you made the slides not that girl Vanshika ? “

“ Yup !! Deadlines were too tight “ सगळं आवरतां आवरतां मी म्हणाले

Will always be “- तो थंडपणे म्हणाला आणि मी चमकले.

आणि त्याच्या पुढच्या वाक्याने माझा काम करण्याचा approach बदलून गेला. तो म्हणाला.. “as an individual contributor you have done a great job but as a leader I was expecting something else .. you will succeed as a leader only when you make your team perform better than you.... you need to Work on it “

हा विचार जुळून आला आणि लख्ख प्रकाश पडल्यासारखं वाटलं. स्वत: ला home minister म्हणवून घेणार्या आपण, एखाद्याकार्यकर्त्याप्रमाणे किती कामे स्वत:वर ओढवून घेत असतो. घर जसं सगळ्यांचं तशी त्याची जबाबदारी सुद्धा सगळ्यांचीच असते. जरस्त्री career बरोबर घरही सांभाळत असेल तर ती कला पुरुषांनीही आत्मसात केली पाहिजे. आणि आपण स्त्रियांनी सुद्धा पुरुषांकडूनdelegation शिकलं पाहिजे. किंबहुना नव्या generation साठी हेच खरे so called “संस्कार” आहेत, जे त्यांना भावनिक दृष्ट्यासक्षम बनवतील. लहानपणीच मुलांना, कुठचाही लिंगभेद न करता हे बाळकडू दिले पाहिजे. आणि ही जाणीव जी व्यक्ती करून देईलती खरी home minister!!

आता मुलांना हळूहळू independent करू लागलेय तसं इतरही मंडळी हातभार लावू लागली आहेत. कोरोनामुळे सुद्धा आपसूकचdelegation शिकलेय. छान वाटतंय आणि म्हणूनच हा लिहीण्याचा खटाटोप. So let’s learn to delegate so that we get to celebrate!! Cheers !!

21 views0 comments

Recent Posts

See All