Search
  • leena dhawan

Enough म्हणता आलं पाहिजे


अतुल कुलकर्णी हे माझ्या आवडत्या अभिनेत्यांपैकी... rather आवडत्या व्यक्तिमत्वांपैकी एक. आणि त्याचं कारण फक्त त्यांचाअभिनय उत्तम आहे एवढंच नाही, तर एक व्यक्ती म्हणूनही त्यांचे विचार खूप प्रगल्भ आणि clear आहेत. त्यामुळे अनेकदा मी त्यांचेinterviews, भाषणं बघत असते... त्यांच्या fb page वर नजर टाकत असते. अशाच एका भाषणात त्यांनी मांडलेला एक विचार मनालास्पर्शून गेला. त्या विचाराचं आणि त्याच्याशी संलग्न इतर जाणकार व्यक्तिंच्या विचारांचं माझं interpretation मी इथे मांडण्याचा प्रयत्नकरते आहे. तेव्हा कृपया त्याबद्दल त्या व्यक्तिंना चूक/बरोबर अशी लेबलं लावू नयेत.

तर त्या भाषणात अतुल कुलकर्णी यांनी मांडलेला विचार असा होता की; “ सर्वसाधारण शिक्षणसंस्कृतीप्रमाणे करिअरचा choice खूपलवकर करण्याचं प्रेशर मुलांवर असतं. आठवी हा दहावीचा पाया आहे असं म्हणत अनेकदा ह्या कोवळ्या आणि खूप limited माहितीअसलेल्या ह्या वयात आयुष्यभर आपण काय काम करणार हा निर्णय घेतला जातो आणि नंतर तो तसाच पुढे राबवलाही जातो. कधीinertia मुळे, कधी EMI भरण्याचं प्रेशर म्हणून, कधी social status चं प्रेशर म्हणून ती व्यक्ति स्वत:च्या आनंदासाठी काम न करताइतरांसाठी काम करत राहते. आपण स्वत:साठी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नकळतपणे गमावून बसतो.”

हे सांगताना त्यांनी एक उदाहरण दिलं. ते असं की, जेव्हा त्यांना मुंबईत घर घ्यायचं होतं तेव्हा त्यांच्यासमोर दोन पर्याय होते. 2BHK किंवा 3BHK. त्यांनी पहिला पर्याय निवडला. कारण त्या दुसर्या पर्यायाचे कर्ज चुकवणं हा काम करत राहण्याचा rather न आवडलेलंकाम करण्याचा हेतू असू नये. न आवडलेलं काम नाकारण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहावं.

कदाचित हेही एक कारण आहे की एखादी व्यक्ति सातत्याने उत्तमोत्तम performances देत आहे. एखादी व्यक्ती फक्त अभिनय ह्याएकाच क्षेत्रात नाही, तर शिक्षण, सामाजिक कार्य, शेती अशा अनेक क्षेत्रांत कार्यरत आहे... त्या अनुभवांचा आस्वाद घेत आहे.

असे choices निश्चितच सोपे नसतात. कारण कितीही म्हटलं तरी पैसा महत्वाचा असतोच. Warren Buffett ह्यांचे “ Money is not everything. Make sure you earn enough before saying that”

हे वाक्य कोपरखळी मारत आपल्याला reality ची नेहमीच आठवण करून देते.

फक्त हे enough म्हणजे किती हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं. कारण त्या enough च्या व्याख्येवर आपलं सौख्य अवलंबून असतं. तीव्याख्या ठरवते की आपण आनंदासाठी... आयुष्याचा आस्वाद घेण्यासाठी काम करणार? की बेगडी social status साठी? किंवा फक्तहप्ते भरण्यासाठी? की पुढच्या सात पिढ्यांनी बसून खावं म्हणून?

सुधा मूर्तींचा एक अविस्मरणीय अनुभव ऐकत होते. त्यात त्या म्हणतात; की एकदा त्या एका गावी by road जात होत्या. अचानकजोरदार पाऊस सुरू झाला म्हणून त्या एका गावातील छोट्याशा मंदिरात थांबल्या आणि सहज म्हणून तेथील पुजार्याशी त्यांचं बोलणंसुरू झालं.

थोड्या वेळाने पाऊस थांबल्यावर त्या तिथून निघाल्या आणि जाताना त्यांनी त्या पुजारीबाबांना काही रक्कम देऊ केली. त्यावर त्यापुजारीबाबांना अत्यंत विनम्रपणे म्हटलं; “ मी इथेच राहतो. गावकरीही खूप काळजी घेतात. बस्स! एवढं पुरे आहे”

सुधाजीं म्हणतात; त्या दिवशी वाटलं की मला आयुष्यात हे असं “ पुरे झालं” म्हणता आलं पाहिजे.

Steve Jobs ही संपूर्ण जगाला inspiration वाटावी अशी व्यक्ती होती. त्यांचे मृत्यूशय्येवरील शेवटचे शब्दही हेच सांगतात की पुरेसंकमावल्यानंतर आपण पैशांच्या पलीकडे असलेल्या गोष्टींसाठी वेळ काढला पाहिजे. आपण आपल्यावर प्रेम करणार्या व्यक्तींसाठी, आपल्याला आनंददायक वाटणार्या गोष्टींसाठी, शारिरीक तसंच मानसिक आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे.

ह्या तिन्ही व्यक्तींनी मला पालकत्वाबद्दल एक खूप मोठा धडा दिला. मुलांना मोठं करताना, ते त्यांच्या जीवनाच्या वाटचालींबाबत निर्णयघेत असताना त्यांना जीवनाचा आस्वाद घेत जगायला शिकवलं पाहिजे. पैशाचं महत्व मी अजिबात नाकारत नाही, पण त्यासाठीमनाविरूद्ध, प्रियजनांना दुरावत, आरोग्याची हेळसांड करत काम करणं ही जीवनाची इतिकर्तव्यता नाही हे त्यांना दर्शवता आलं पाहिजे. शेवटी काम हा आपल्या आयुष्याचा फक्त एक “छोटासा” भाग असतो..... काम म्हणजे आयुष्य नाही.

24 views0 comments

Recent Posts

See All