Search
  • leena dhawan

Coding चं कोडंकाल दुपारी जरा relax करत होते... बहिणीशी chat चालू होता आणि तेवढ्यातच society च्या WhatsApp group वर एकpost पाहिली.

“Computer language summary workshop

C++, python, Java

Age : 9 years “

मी उडालेच. बहीणीला ती post पाठवली आणि म्हटलं, “ ए हे बघ काय! नवव्या वर्षापासून computer language काय आणिकोडींग काय? Are they serious? “

ती म्हणाली, “ आहेस कुठे? ते सहाव्या वर्षापासूनच सुरू करायला सांगतात”

आता मला चक्कर येणं बाकी होतं.

मी ती एक ad बघितली होती ज्यात एक सहा सात वर्षांचा मुलगा app तयार करताना दाखवलेला आणि त्याने बनवलेल्या त्या app वर investors तुटून पडताना दाखवलेले; आणि “काय मूर्खपणा आहे” म्हणून मी ते सोडून दिलं होतं. पण आता मात्र तो मूर्खपणाअगदी अवती भवती जाणवू लागला होता.

उगाचच मग माझ्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं.

कुठून बरं ह्या सगळ्याची सुरूवात झाली असेल? का बरं ह्यांना वाटतं की ही इवली इवली मुलं कोडींग करू शकतील? आणि जर हीकोडींग करतात तर मग त्या हजारो इंजिनीअर्स काय जे दर वर्षी pass out होतात? कुठेतरी काहीतरी घोळ आहे का? ... आपणकाहीतरी misconstrue करतो आहोत का?

हे सगळं डोक्यात चाललं होतं तेवढ्यात सासुबाईंनी हाक मारली. नवी washing machine चालवताना त्यांचा पुरता गोंधळ उडालाहोता. त्यांना machine लावून दिली. त्या खजिल हसल्याआणि म्हणाल्या “ का कोण जाणे माझ्या ध्यानातच येत नाही बघ. तुलाचजमतं “

आणि त्यांच्या त्या वाक्याने माझी tube पेटली.

Washing machine, tv, music system आणि आता microwave, laptop ह्या गोष्टी ऐंशी-नव्वदच्या दशकातल्या मुलांच्याअंगवळणी पडल्या होत्या. कारण त्या त्यांनी बरेच वर्ष हाताळल्या होत्या. पण ह्याच गोष्टीं जुन्या पिढीला मात्र कधी कधी बावचळूनटाकतात बरं का!

ह्या गोष्टी वापरण्यासाठी सवय लागते, हुशारी किंवा बुद्धिमत्ता नाही. तसंच जर हल्ली अगदी दोन वर्षाचं मूलही mobile, tab सफाईनेवापरत असेल हा फक्त त्याच्या सवयीचा गुण आहे आणि त्याच्या पिढीला मिळालेल्या प्रचंड exposure ची ती कमाल आहे. कदाचितम्हणूनच त्यांच्यासाठी computer संबंधित ज्ञान prepone करण्याचा विचार केला जातो. हया गोष्टींमुळे त्याचा बुद्ध्यांक कदाचितखूप लवकर वाढत असेल आणि फक्त तेवढंच नाही तर तो खूप जास्तही असेल पण त्याच्या सामाजिक आणि भावनिक विकासाचंकाय?

सध्या Daniel Golman ह्यांच Emotional Intelligence हे पुस्तक वाचतेय आणि त्यातलं एक वाक्य मला मनापासून पटलं. तेम्हणजे... “ CEOs ना त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे आणि व्यावसायीक कौशल्यामुळे कामावर घेतले जाते आणि भावनिक बुद्धिमत्तेच्याअभावामुळे कामावरून काढून टाकले जाते”. हे वाक्य एखाद्या व्यक्तीच्या emotional intelligence च्या महत्वाचे द्योतक आहे.

मी प्रतिगामी विचारांची नाही किंवा टेक्नॉलोजी विरोधात तर अजिबातच नाही; पण प्रत्येक गोष्टीचं एक वय असतं आणि त्या वयातत्याच गोष्टी केल्या नाहीत तर नंतर खूप पश्चाताप होतो. सहा- सात वर्षांच्या चिमुकल्यांना computer language पेक्षा खेळण्या- बागडण्याची, सामाजिक भावना जागृत करण्याची जास्त गरज असते.

आणि तसं जर झालं नाही तर ही मुलं अभ्यासात खूप हुशार होतील पण कदाचित एकलकोंडी होतील, त्यांना इतरांना आणि स्वत:लाहाताळण्याची कला शिकता

येणार नाही. तेव्हा कोडींग म्हणा किंवा computer languages म्हणा जेव्हा शिकायचं तेव्हा मुलं शिकतीलच पण त्याआधी त्यांनामनसोक्त हुंदडू देऊया, पडू-धडपडू देऊया. जेणेकरून ती मोकळी होतील, पडल्यावर सावरायला घाबरणार नाहीत, माणसं तर ओळखूलागतीलच पण स्वत:लाही ओळखायला शिकतील.

18 views0 comments

Recent Posts

See All