Search
  • leena dhawan

वारसा


एक romcom मूव्ही पाहात होते.. “ दे दे प्यार दे” ... अजय देवगण आणि तब्बू यांचा. सिनेमाचा विषय जरी extra marital affair वगैरेअसला तरी ह्या लेखाचा विषय वेगळा आहे .. तेव्हा relax.

त्यात आई-वडीलांमधील वादामुळे किंवा त्यांच्या घटस्फोटामुळे किंवा वडिलांच्या असणार्या विवाहबाह्य संबंधामुळे जेव्हा मुलांवर वाईटपरिणाम होईल असं बचावात्मक धोरण घरातील वडिलधारे पुढे करतात तेव्हा तब्बू एक खूप छान दृष्टिकोन मांडते; “आमची मुलं म्हणून...आमचे वारस म्हणून या मुलांना जसा आमचा पैसा-अडका, आमचं सामाजिक स्थान, सगळे comforts मिळत आहेत आणि मिळणारआहेत; तसंच त्यांना आमच्या मुळे असलेले problems सुद्धा मिळणार आहेत. मुलांना पालक जसं as is स्वीकारतात तसंच मुलांनीहीत्यांना स्वीकारलं पाहिजे”. Guilty parenting कडून empowered parenting कडे नेणारा असा हा विचार मला वाटला.

एका research नुसार आजकालचे पालक पूर्वीच्या पालकांपेक्षा जास्त वेळ मुलांबरोबर घालवतात. आणि फक्त आईच नाही तरवडीलही मुलांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवतात. असं असूनही पालकांमध्ये (especially स्त्री पालकांमध्ये) guilt दिसून येते.

एक सुशिक्षित, well settled पालक म्हणून आपण मुलांना शिक्षणाच्या , सर्वांगीण विकासाच्या संधी उपलब्ध करून देत असू, त्यांनायोग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची ability develop करत असू तर त्यासाठी गरजेचा असणारा वेळ आणि efforts आपल्याला आपल्याकामाच्या ठिकाणी द्यावेच लागणार आहेत. आणि मुलांनाही जर ह्याचा फायदा होणार असेल तर त्याबरोबर येणारे long working hours त्यांना स्वीकारावेच लागतील.

त्यासाठी जसे पालकांनी work -life balance आणण्यासाठी प्रयत्नशील असण्याची गरज आहे तसंच निरर्थक guilt पासून स्वत:लामुक्त ठेवण्याचीही गरज आहे. अशा वेळी; मुलांशी मोकळा संवाद, पालक म्हणून स्वत:च्या authority ची स्वत:मध्ये तसेच मुलांमधेजाणीव आणि गरजांचं भान ह्या गोष्टी आपल्याला योग्य निर्णय घेण्यास निश्चितच मदत करू शकतात. आणि जर तसं झालं तर फक्तभौतिक गोष्टींचाच नाही तर पालकत्वाचील आदर्शाचाही वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीला देऊ शकू.

2 views0 comments

Recent Posts

See All