Search
  • leena dhawan

लाभले आम्हास भाग्य....

आजकाल virtual schooling मुळे मुलांच्या अभ्यासाबरोबर, खुद्द मुलांबरोबर संपर्क वाढलाय. त्यांच्यात होणारे बदल, त्यांचे हज्जारप्रश्न ह्यांना उत्तर देताना कधीकधी जीव मेटाकुटीस येतो पण खूप मज्जा वाटते.

मुलाला नर्सरीला असताना शाळेत घातलं तेव्हा त्याला फक्त मराठी बोलता येत होतं.... आम्ही दोघेही बाहेर असल्यामुळे एक तर तोजास्त वेळ आजी आजोबांबरोबर असायचा आणि otherwise घरातही मराठीच बोललं जायचं; तसंच त्याला मित्रपरिवार नव्हता. शाळेतल्या शिक्षिका मात्र अमराठी भाषिक असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी इंग्रजीत किंवा हिंदी बोलल्यावर त्याची पंचाईत होऊ लागली.

मग आम्हीही त्याच्याशी इंग्रजीत बोलायला सुरुवात केली... YouTube वरच्या videos ची सोबत तर होतीच. सहा महिन्यातच त्याच्याआणि धाकट्याच्या शब्दसंग्रहात, उच्चारांत उल्लेखनीय बदल जाणवला.

आम्हीसुद्धा भलतेच खूष झालो.

आम्ही दोघेही vernacular medium चे. इंग्रजी बोलताना आजही बर्याचदा मनात मराठी वाक्य पहिलं तयार होतं आणि मग त्याचंtranslation होतं. Don’t worry मी त्या “REMOVING printout from printer” एवढं वाईट नाही बोलत पण तरीही इंग्रजी हीमाझ्यासाठी business language च आहे. कधी कधी उच्चारांसाठी, म्हणींसाठी Google ची मदत लागतेच. तेव्हा, आमचा मुलगाएवढं अस्खलित इंग्रजी बोलतो; जे आम्हाला आत्ता येतं त्याचं कौतुक होतंच. पण त्याच बरोबर आम्हाला कॅालेजच्या सुरुवातीलाजाणवलेला न्यूनगंड त्याला अनुभवावा लागणार नाही अशी अपेक्षाही होती. या सगळ्या प्रवासात मराठी मागेच राहूनच गेली हे ध्यानातचआलं नाही.

पण आजकाल त्यांच्याबरोबर स्वर, व्यंजनं ह्यांची पुन्हा उजळणी करताना मला त्याच्या उच्चारांमधील वेगळेपणाच प्रकर्षांने जाणवूलागला. आणि त्याच बरोबर जाणवू लागलं ते आपल्या भाषांचं.. आपल्या देवनागरी लिपीचं वैविध्य आणि वैभव. हे उच्चार करतानाआपल्या जीभेचा, घशाचा आणि अनुनासिकं उच्चारताना नाकाचा विविधतेने केला जाणारा वापर. म्हणून तर बघा एकदा... ख, ठ, ढ, थतुम्हालाही तेच जाणवेल जे मला जाणवलं. विचारा स्वत:ला ङ, ञ ह्यांचा उच्चार आठवतो का? हे सगळं आठवलं आणि वाटलं कीइंग्रजीचं महत्व जागतिक भाषा म्हणून निश्चितच आहे; राष्ट्रभाषा म्हणून आणि बॅालीवूडची भाषा म्हणून हिंदी ही त्यांना येईलच पणआपल्या मातृभाषा आणि राज्यभाषा असलेल्या मराठीशी त्यांची नाळ आपण शाबूत ठेवली पाहिजे. आणि हो मातृभाषेतून समजावलेलीगोष्ट कधीही जास्त चांगली समजते ही गोष्ट अगदी प्रमाणानिशी सिद्ध आहे.

मराठी येत असल्यामुळे आपल्याला ज्या साहित्याचा, संगीताचा, नाट्याचा आस्वाद घेता येतो तो वारसा आणि ते सौभाग्य त्यांनामिळवून देण्याचं काम पालक म्हणून आपण नाही करायचं तर कोणी करायचं!

चला तर मग हर हर महादेव! PC - Google


11 views0 comments

Recent Posts

See All