Search
  • leena dhawan

मुलांवर ओरडण्याआधी….

“अमर्त्य ... आर्यन अरे चला ना आंघोळीला. उशीर होतो मग सगळ्याच गोष्टींना” माझी टेप चालूच होती. आमच्या घरातलं रोजचंच हेचचित्र. एवढं बोलून सुद्धा मुलं ढिम्म हलत नव्हती आणि background मध्ये नवर्याचं शेअर मार्केट चालूच होतं, त्यामुळे त्यालाआजूबाजूस काय चालंलं आहे ही गोष्ट नगण्य होती. मी वैतागले आणि तशीच तडतडत आंघोळीला गेले. मी सगळं आवरून बाहेर आलेतरीही बाहेरची परिस्थिती तशीच होती.

“ तू काही तरी बोल ना त्यांना, माझं ऐकतंच नाही आहेत” - मी नवर्याला म्हटलं

“कुछ नया सुनाओ यार!” - म्हणत मलाच कोपरखळी मारत तो आत निघून गेला

For a change HE WAS RIGHT.

माझं विचारचक्र सुरू झालं. Advertising मध्ये असताना आमचे creative director नेहमी म्हणायचे, “तुमच्या product मध्येकिंवा तुमच्या message मध्ये जर काही नाविन्य नसेल तर त्याच्या representation मध्ये तरी काहीतरी नाविन्यपूर्ण असावं जेग्राहकाचे लक्ष वेधून घेईल.” त्यांचे हे शब्द आठवले आणि Close-up ची “ क्या आप close- up करते है?????” वाली जाहिरातहीआठवली.त्या जाहिरातीतल्या नाकातल्या आवाजाने आणलेले वेगळेपण आणि विनोदी बाज आजही ग्राहकांच्या लक्षात आहे. ह्यावरूनएक कल्पना सुचली आणि दुसर्याच दिवशी मी ती अंमलातही आणली.

मुलं नेहमीप्रमाणे उठल्यावर मी फर्मान काढलं, “ no body will enter bathroom today to take bath”

त्याबरोबर दोघे अगदी चढाओढीने ‘आंघोळ करण्यासाठी’ माझ्या विरोधात उभे ठाकले.

नवरा म्हणाला “ idea छान आहे पण रोज नाही चालणार”

त्याचं म्हणणं बरोबर होतं. काहीतरी permanent solution हवे होते.. फक्त मुलांच्या आंघोळीच्या समस्येवर नाही, तर एकूणचमुलांबरोबर होणार्या रोजच्या वाटाघाटींमुळे उडणार्या खटक्यांवर आणि माझ्या होणार्या चिडचिडीवर सुद्धा.

“Calm parents, Happy kids” हे माझं parenting वरचं अत्यंत आवडलेलं पुस्तक. त्यातलाच एक उपाय मी वापरून पाहिलाआणि लागूही पडला. तो असा की आजच्या पिढीला directions पेक्षा choices दिलेले जास्त आवडतात. म्हणजेच त्यांना स्वातंत्र्यदिलेलं आवडतं. तेव्हा आजकाल त्यांना कुठचीही गोष्ट करा असे न सांगता choices देते... आंघोळीला आता जायचं की दहामिनिटांनी? Homework करून जेवणार की आधी जेवून घेणार? मुलांचा प्रतिसाद better आहे आणि माझी चिडचिड कमी झालीआहे.

आता जेव्हा मी माझ्या आधीच्या वागण्याकडे बघते तेव्हा वाटतं, मी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करत होते आणि response बदलण्याचीचुकीची आशा करत होते. त्यामुळे frustrate होऊन साहजिकच माझी चिडचिड होत होती.

मुलांवर ओरडणे हे जितकं सोपं आहे तितकंच ते कुचकामी सुद्धा आहे. कारण त्यामुळे मुलांचं लक्ष आपल्याला अपेक्षित action कडे नजाता आपल्या सांगण्याच्या पद्धतीकडे जातं आणि मग ती दुर्लक्ष करणं prefer करतात. तेव्हा मुलांचा स्वभाव आणि कल समजून, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा मान राखून जर आपण आपल्या अपेक्षा मांडल्या तर कदाचित अपेक्षित response मिळू शकतो.

चला तर मग पालक म्हणून स्वत: ला challenge करून बघूया आणि आपला संदेश किंवा अपेक्षा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्याकल्पक पद्धती शोधून काढूया.

P.C.- Google


48 views0 comments

Recent Posts

See All