Search
  • leena dhawan

मी माझा... नाही कोणासारखाहल्लीच Big Bull हा अभिषेक बच्चन चा सिनेमा release झाला. आणि as usual अभिषेक बच्चन troll झाला. मी गुरू पाहिलाय, मी युवा पाहिलाय आणि अलीकडेच ल्युडो सुद्धा पाहिलाय. हे तीनही मूव्ही पाहतांना एक सामान्य दर्शक म्हणून मला तरी अभिषेकबच्चन चांगला वाटला. त्या कथानकातील चरित्राशी तो पूर्णपणे एकरूप वाटला.

पण गफलत तेव्हा होते जेव्हा त्याची तुलना होते. जी unfortunately होणारच. सुपरस्टार अमिताभचा मुलगा असल्याचे जसे फायदेआहेत तसेच तोटे सुद्धा.

जेव्हा कंगना राणावत ने “नेपोटिझम” च्या विरूद्ध बंड पुकारलं तेव्हा माझ्यातला मार्केटिंगचा किडा जागा झाला. उगाचच मी ह्यासगळ्यांचा analysis सुरू केला... मनातल्या मनात बरं का?

म्हणजे बघा; मार्केटिंग मधे Product positioning म्हणून एक concept आहे. म्हणजे product चं ग्राहकाच्या मनातलं unique स्थान. उदाहरणार्थ lux म्हणजे सिनेतारकांच्या सौंदर्याचं रहस्य, Johnson and Johnson म्हणजे babysoft.... वगैरे वगैरे

कंगना ने स्वत:चं positioning, self made असं बनवलंय; अक्षयकुमार सध्या patriotic घाटणीमध्ये focus ठेवून आहे तर आमिरहा सामाजिक भान असलेल्या कलाकारांमध्ये मोडतो. सोनम कपूर एक अभिनेत्री म्हणून सुमार असली तरी fashion diva म्हणून तिचीओळख ग्राह्य धरण्यासारखी आहे.

सनी देओल एक action hero म्हणून नावारूपाला आला, अभय देओल एक वेगळ्या घाटणीचा उत्तम कलाकार म्हणून पण ती किमयाबॅाबी देओलला साधता आली नाही.

जो जो कलाकार अशा प्रकारचं positioning मिळवण्यात यशस्वी होतो तोच टिकून राहतो. कारण सुंदर, fitness freak, acting मध्ये बरे असे अनेक आहेत पण प्रेक्षकांना वेगळं असं जो offer करतो तोच त्यांच्या लक्षात राहतो. अर्थात ह्यात नशीबाचा भाग आहेचपण हे गमक कळणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर अशा लोकांची अवस्था प्रचंड वाढलेल्या वडाखाली वाढ खुरडलेल्या झुडुपासारखीझाली तर नवल नाही.

पालक म्हणून जेव्हा मी ह्या गोष्टीकडे पाहते तेव्हा मी सतत स्वत:ला आठवण करून देते की मुलांना सगळ्या facilities देताना स्वत:चंवेगळेपण निर्माण करण्यासाठीही मला त्यांना उद्युक्त केले पाहिजे. कारण माझ्या लहानपणी डॅाक्टर, इंजिनिअर, MBA ह्या डिग्रींचंअप्रूप होतं. आता मात्र तसं नाही. आता मुलांसमोर खूप options आहेतच पण स्पर्धाही खूप आहे.

ही एक गोष्ट ; पण दुसरं म्हणजे त्यांची सतत तुलना होण्याला आणि करण्याला पालक म्हणून मला आवर घालता आला पाहिजे. कुटुंबामध्ये अनेकदा अगदी सहज म्हणून कोणासारखं तरी व्हायचं असं म्हणून inspire करण्याचा so called प्रयत्न केला जातो. आणि मग कळत नकळत मुलांचा त्या तुलनेच्या मार्गावर प्रवेश होतो. आता fortunately मुलाचा तोच genuine interest असेल तरठीक पण जर तसं नसेल तर मात्र त्या व्यक्तिची कुचंबणा आणि सततच्या तुलनेतून आलेली निराशा निश्चित असते.

आता दरवेळी ह्याचा पालक जबाबदार आहेत असं मी म्हणणार नाही. कारण अनेकदा मुलंसुद्धा वंशपरंपरागत उद्योग, सोपा आणिcomfortable option म्हणून स्वीकारतात.

शेवटी जावेद अख्तर ह्यांचे मला मनोमन पटलेले एक उद्गार share करेन ; “ आवाज याद रहती है... गूंज नही”

चार पावसाळे जास्त पाहिलेयत; म्हणूनच आपण पालकांनी मुलांना त्यांचा असा “खणखणीत” आवाज ओळखायला मदत करूया!

6 views0 comments

Recent Posts

See All