Search
  • leena dhawan

माता...आई...मम्मी...मॅाम


काही दिवसांपूर्वीच मी माझ्या tell a tale ह्या fb page वर एक गोष्ट प्रकाशित केली होती. गोष्टीचं नाव होतं “किंमत”. आयुष्यातकोणालाच सगळं काही हव्वं तसं हव्वं तेव्हा मिळत नाही. माझे एक सर होते ते म्हणायचे... आवडेल ते करणं म्हणजे स्वातंत्र्य आणिकरतोय ते आवडणं म्हणजे समाधान..... आणि हे ज्याला उमगलं तोच सुखी होऊ शकतो.

अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींची किंमत असतेच... जी ज्याला परवडेल आणि पटेल तशी ती त्याने अदा करायची असते. आणि फक्तस्त्रियांनाच नाही तर पुरूषांना सुद्धा हा नियम लागू होतो. करिअर आणि मुलांमधे balance करू इच्छिणार्या अशा मुलीची ती गोष्ट होती. त्यावर अनेक comments ही आल्या आणि as expected त्यातील काही थोड्या खोचकही होत्या... कसं काही आयांना कळत नाही कीनोकरी केल्यामुळे घराकडे दुर्लक्ष होतं वगैरे वगैरे. त्यावर मगइतर वाचकांच वाक्- युद्ध सुरू झालं हे अलाहिदा पण मी शांतच होते.

मनातल्या मनात माझा analysis सुरू झाला. म्हणजे बघा, अगदी सुरूवातीपासून सुरू करुया... म्हणजे सामान्यांना परिचीत असलेल्याकाळापासून बरं का..

कुंती .. म्हणजेच पांडवांची परमप्रिय असलेली आई जिने स्वत:च्या आणि कुळाच्या इभ्रतीसाठी कर्णासारख्या मुलाचा त्याग केला. पणतरीही इतिहास तिला एक चांगली आई म्हणूनच ओळखतो.

जिजाऊ ... ज्यांना स्वराज्य घडविण्याच्या एकमेव महत्वाकांक्षेसाठी स्वत:चं कुटुंब पणाला लावलं.

त्याच्या बद्दल च्या आदराला तर मराठी मनात तोड नाही.

कधी कधी वाटतं त्यांनाही त्यांच्या घरच्यांकडून विरोध झाला असेलच की!

रमाबाई आंबेडकर ह्यांनी जे केलं त्यामुळेच मागासलेल्या जातींतील पुढच्या असंख्य पिढ्यातील स्त्रिया स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. पण ते त्या काळात अक्षम्य होतंच की!

एकूणचं काय ज्यांनी इतिहास घडवला त्यांच्याकडूनही चुका झाल्या, त्यांनी बलिदान दिलं, त्यांनी चौकटी मोडल्या.... पण आज आपणत्यांना “उत्तम माता” म्हणूनच ओळखतो.

बरं हे झालं प्रसिद्ध असलेल्या स्त्रियांचं.... आता थोडं आपापल्याच जुन्या पिढ्यांमध्ये डोकावून बघा.

म्हणजे असं की आपली खापर पणजी सोवळं नक्कीच पाळायची. त्याकाळातल्या तुटपुंज्या उत्पन्नात तिनेसुद्धा मुलाच्याच शिक्षणालाsupport केला असणार. म्हणून का ती वाईट ठरली?

आपल्या पणज्यांनी आजींनी मुलींना शिकू दिलं पण बर्याचदा त्याचा उद्देश स्थळ चांगलं मिळावं हा होता. सुनांना नोकरी करू दिली पणत्याकाळी करिअर ही संकल्पना तेवढीशी प्रचलित नव्हती. पण त्या म्हणा किंवा त्याच्या पुढच्या पिढीतील स्त्रिया म्हणा आपण आईम्हणून त्यांना चांगलंच म्हणू.

मग आता जेव्हा काळ बदलला, महत्वाकांक्षा बदलल्या आणि मुलांच्या अपेक्षांही बदलल्या; तेव्हा कोणीही ह्या अशा temporary labels ना का घाबरावं?

आई म्हणून स्त्री evolve होत गेली आहे. तशा तिच्या बाबतच्या अपेक्षाही evolve झाल्या पाहिजेत.

एक खूप सुंदर post पाहिलेली; ज्यात एक घडा आणि तीन स्त्रिया दाखवल्या आहेत. घडा एकच आहे पण प्रत्येकीची तो carry करायचीपद्धत वेगळी. तसंच मातृत्व ही जबाबदारी आहे आणि ती निभावण्याची प्रत्येक स्त्री ची पद्धत वेगळी असूच शकते की!

पण कुठच्याही काळात, कुठच्याही स्वरूपात आई ही तितकीच प्रेमळ, तितकीच जबाबदार आणि तितकीच कर्तव्यदक्ष असते.

तुम्हाला काय वाटतं?

0 views0 comments

Recent Posts

See All