Search
  • leena dhawan

पुस्तकांपलीकडले शिक्षणकोरोनाकाळात मी करिअरमधे एक ब्रेक घेतला आणि तेव्हाच GenX Parenting हे ब्लॅाग पेज सुरू केलं. #theroadlesstravelled ह्या त्यातल्या एका व्हिडिओ सीरीज च्या निमित्ताने मी माझ्या ओळखीतल्या आणि अनोळखी अशा अनेक लोकांना भेटले ज्यांनीचाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं करायचा यशस्वी प्रयत्न केला.

ह्या सगळ्या मंडळींमधे काही गोष्टी common होत्या बरं का.

एक तर ह्या सगळ्यांनीच त्यांचा comfort zone अगदी जाणूनबूजून, प्रयत्नपूर्वक मोडीत काढला होता

दुसरी म्हणजे, ह्या सगळ्यांनी अनेकदा अपयशाचा सामना केला होता आणि तिसरी, सगळ्या विचित्र गोष्ट म्हणजे, ह्या सगळ्या मंडळींनीत्यांच्या यशाचं श्रेय कुठल्याही aptitude दर्शवणा-या indicators ना (मार्क्स, degree) न देता, त्यांच्या ATTITUDE ला दिलंहोतं.

याचा अर्थ शिक्षणाचं महत्व कमी आहे असा अजिबात होत नाही; परंतु, आयुष्यात प्रत्येक घटनेला सामोरं जाण्याचा आपलाapproach, म्हणजेच attitude चं महत्व कैकपटीने जास्त आहे हे अधोरेखित करावंसं वाटतं.

Unfortunately, हा attitude कुठल्याही शाळेत शिकवला जात नाही, तर पालकांच्या वागण्यातून, घरच्या वातावरणातून आणिमुख्य म्हणजे स्वतःच्या अनुभवांतून माणूस तो शिकत असतो.

ही गोष्ट जेव्हा जाणवली तेव्हा वाटलं, कालानुरूप करिअर्स बदलली, अनेक options दिसू लागले, पण यशापयशाच्या संकल्पनाअजूनही पैशाशीच संलग्न आहेत.

आमच्या आजी-आजोबांनी काही सुख-सोयी पाहिल्या नव्हत्या, आई-वडिलांनीही काटकसरच अनुभवली होती आणि म्हणूनचत्याच्यासाठी काम = पैसा हे equation पक्कं होतं.

पण आमच्या पिढीने पैसा पाहिलाय, globalisation मुळे सुखसोयींचा आस्वाद घेतलाय आणि करिअर मागे धावताना येणा-या mid-life crisis चा ही अनुभव घेतोच आहोत.

मग असं असताना, आम्ही मुलांना मार्क्स, पगार ह्याच्या पलीकडे जाऊन आयुष्याचा विचार करायला शिकवलं पाहिजे नाही का?

अलीकडेच एका vlog च्या निमित्ताने एका cognitive behavioural therapist ला भेटले. बोलता बोलता ती सहजच म्हणाली; आयुष्यात यशाची कधीच खात्री नसते पण अपयश, disappointments येतातच. पालक म्हणून अपयश कसं पचवायचं हे शिकवणंmust आहे… किंबहुना हेच खरं शिक्षण आहे.

“ let’s NOT prepare them for Job; let’s prepare them for LIFE”

कदाचित मग ही मुलं नव्या वाटा चोखाळायला घाबरणार नाहीत, अपयशाने depress होणार नाहीत आणि मुख्य म्हणजे मनापासूनजगायला शिकतील.

34 views1 comment

Recent Posts

See All