Search
  • leena dhawan

पालकांची (virtual) शाळा


गुरुपौर्णिमेला अनेक पोस्टस् पाहिल्या. पण मला सगळ्यात आवडली ती एक पोस्ट, ज्यात माणसाने कोरोनाला गुरू मानून त्यालालोटांगण घातले आहे. खरचं कोरोनामुळे खूप नवे अनुभव मिळाले आणि खूप अशक्यप्राय वाटणार्या गोष्टीही करता आल्या. त्यामुळेच कोरोनाला गुरू म्हटलं तर त्यात काही वावगं वाटायचं कारण नाही.

अशीच एक “ न भूतो भविष्यति।” वाटणारी गोष्ट जी आता समस्त पालकजन करताहेत ती म्हणजे “ virtual schooling “ . माझ्या मोठ्या मुलाचे Jr. Kg चे admission झाले होते, त्यामुळे त्याच्या शाळेने हे फर्मान काढल्यामुळे त्याच्यापेक्षा मीच जास्तघाबरले. पण शेवटी “ कालाय तस्मै नम: ।” म्हणत मी virtual शाळेला जायची तयारी करू लागले.

दिवसांगणिक माझा सामना रोज नव्या challenges शी होत होता आणि एवढं करूनही हा लक्ष देत नाही म्हणून चिडचिड वाढत होती.

एकदा हताश होऊन मैत्रिणीशी बोलत होते आणि तिने सहज विचारलं - “ लेकिन उसका problem क्या है? “

आणि माझी बोलतीच बंद झाली. माझ्याकडे त्याच्या complaints ची यादी होती पण त्यामागचं कारण मला अज्ञात होते.

तिच्या प्रश्नाने माझे विचारचक्र सुरू करून दिले होते.

त्याचे virtual sessions मधील वागण्याचे निरीक्षण केल्यावर जाणवलं की त्याला अनोळखी गोष्टींबद्द्ल extreme discomfort होता. म्हणूनच, literacy class मधे शांत राहणारा माझा मुलगा हिंदी class मधे restless होत होता. Activities मधे त्याला रस होता पणलिहिण्यास त्याचा सक्त विरोध होता. ह्या वर माझ्याकडे दोन मार्ग होते... पहिला, त्याला त्याच्या गतीने जाऊ देणं आणि दुसरा, त्याच्याअभ्यासाला त्याच्या आवडीच्या गोष्टींशी संलग्न करणं. मी दुसरा मार्ग निवडला.

सर्वप्रथम, मी त्याला session ला चल म्हणून मागे लागणं बंद केलं.... फक्त “school time” एवढीच सूचना द्यायची असं ठरवलं. कारण, शाळेत जाणं ही त्याचीही जबाबदारी आहेच की! And Trust me... delegation works ! आता शाळेची वेळ 90 मिनिटांचीआहे आणि तरीही तो विनातक्रार बसतो. माझा पहिला किल्ला सर झाला होता.

आता मी माझा मोहरा त्याच्या अनोळखी गोष्टींबद्दल वाटणार्या भीती कडे वळवला. आणि त्यावर एकच रामबाण उपायहोता....अनोळखी गोष्टींशी ओळख वाढवणे. ... त्मी त्याला हिंदी rhymes , गोष्टी ऐकवायचा प्रयत्न केला पण त्याने काही माझी डाळशिजू दिली नाही. मग एक दिवस सासूबाई बोलतां बोलतां सहज म्हणाल्या की विक्रमने ( माझ्या नवर्याने) कॅालेजला असताना त्याच्याअभ्यासाचे तक्ते बनवले होते आणि अगदी बाथरूमच्या भिंतींवरही लावले होते. बस्स!! मला idea मिळाली. मी रंगीत तक्ते बनवूनत्याच्या खोलीच्या भिंतींवर, दरवाज्यावर लावले. तो येताजाता गंमत म्हणून ते वाचू लागला आणि मला प्रश्न विचारू लागला. प्राण्यांची, रंगांची, भाज्यांची हिंदी नावे विचारून त्याने मला अगदी भंडावून सोडले. माझी दुसरी मोहिम फत्ते झाली होती.

परंतु अजून सगळ्यात कठीण गोष्ट बाकी होती... ती म्हणजे त्याला लिखाणाची गोडी लावणे. मी एव्हाना सगळे प्रयत्न करून थकलेहोते.... पण आमची गाडी काही पुढे जात नव्हती. आणि एक दिवस त्यानेच मला एक कल्पना सुचवली.

माझ्या मुलाला प्राण्यांचे वेड आहे आणि तो आमच्या मागे सतत विविध प्रजातींच्या प्राण्यांची खेळणी मागवण्याचा हट्ट करत असतो. म्हणून एकदा वैतागून म्हटलं “ तू तुझ्याकडे नसलेल्या प्राण्यांची यादी कर बघू.”

आणि तो कागद - पेन्सिल घेऊन हजर झाला.

बघतां बघतां आम्ही बर्याच प्राण्यांची नावे लिहून काढली. 😀😀😀

अजूनही आमच्या रोज काहीना काही कुरबुरी चालूच असतात. सरळमार्गी चालेल ते मूल कसले म्हणा! पण त्याच्या प्रत्येक आडवळणीवागण्याला creatively उत्तर शोधायचा प्रयत्न करते आणि म्हणते ... “ आखिर रिश्ते मे तो हम आपकी मॅां लगते है। “

0 views0 comments

Recent Posts

See All