Search
  • leena dhawan

पालकत्वाच्या सीमा

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका अत्यंत high profile आणि सुविद्य अशा मराठी जोडप्याच्या मुलाने

आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक तर्कवितर्क निघाले... as usual गाडी “आई-वडिलांच्या संस्कारांवर... त्यांचं लक्ष नसण्यावर” घसरली.

त्यानंतर मुलाच्या वडिलांनी लोकसत्तामधे जाहीरपणे त्यांचे मनोगत लिहिले होते. त्याद्वारे त्यांनी त्यांच्या संस्कारांवर, घरातीलवातावरणावर केलेल्या आरोपांना उत्तर देण्याचा प्रयत्नही केला होता. तो प्रयत्न कितपत यशस्वी झाला याचे उत्तर मिळणे कठीण आहेपण एक गोष्ट मात्र नक्की की, काहीही केलं तरी, म्हणजे मुलं वाईट वागली... अयशस्वी झाली तर किंवा चांगली वागली .... यशस्वीझाली तरी समाज आणि खुद्द पालकाही त्या गोष्टीसाठी संपूर्णपणे जबाबदार असल्याचा आविर्भाव आणतात. कदाचित हे एक कारणआहे ज्यामुळे parenting आणि stress ह्या दोन गोष्टी नेहमी हातात हात घालून चालतात.

माझी मुलं तर अजून खूप लहान आहेत पण तरीही कधी कधी त्यांच्या समोर हतबल वाटतं. म्हणूनच ह्या विषयावर लिहिण्याचा आणिमला मिळालेले references वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.

John Rosemamd ह्या parenting expert चा एक लेख मी वाचला होता. वाचून वाटलं की सगळ्या देशांत समाजाचीपालकांबद्दलची मानसिकता थोड्याफार फरकाने सारखीच असते की.

ह्या लेखात John Rosemand म्हणतात, पालक हे मुलांच्या संदर्भातील अनेक influencers पैकी एक influencer असतात. शिक्षक, मित्र-मैत्रिणी, सामाजिक परिस्थिती, आजूबाजूस घडत असलेल्या घटना, मिळणार्या संधी इत्यादी असंख्य गोष्टी एकाव्यक्तिच्या जडणघडणीवर आपला ठसा उमटवतात. पण ह्या सर्वांपेक्षा जास्त एक गोष्ट matter करते; ती म्हणजे, खुद्द त्या व्यक्तीचीविचारसरणी.

आपल्या आजूबाजूलाच पाहा, जरा इतिहासात डोकावा, अशी अनेक उदाहरणे दिसतील ज्यात एका उत्तम कुटुंबात जन्माला आलेले मूलआयुष्यात काही फार मोठा पल्ला गाठू शकले नाही. मोठ्या अभिनेत्याचा, डॅाक्टरचा, नेत्याचा मुलगा किंवा मुलगी हरप्रयत्न करूनहीफार मोठ्या उंचीवर पोहोचू शकत नाही.

याउलट, ज्यांनी इतिहास घडवला अशा व्यक्ती सर्वसामान्य आईबापाच्या पोटी जन्माला आल्या होत्या.

याचा अर्थ असा निश्चितच नाही की पालक बदल घडवत नाहीत. पण, आपण आपल्या मुलास एक problem-free आयुष्य देऊ, ह्याभ्रमात राहून जीवाचं रान करण्याची किंवा आपणच कुठेतरी कमी पडलो म्हणून आपलं मूल चुकलं, ह्या भावनेने कुढत राहण्याचीपालकांना गरज नाही.

जेव्हा पालक ही so called “जबाबदारी” घेणं सोडतील, तेव्हा त्यांचा बराचसा stress कमी होईल.

Oh! My God ह्या अतिशय गाजलेल्या चित्रपटात हे scene आहे. त्याच protagonist परेश रावल म्हणजेच कानजीभाईच्या मागेकाही गुंड लागलेले असतात. आणि कृष्ण म्हणजेच अक्षयकुमार एका बाईकस्वाराच्या रुपात त्याच्या मदतीला येतो. कानजीभाईलागुंडांपासून दूर नेल्यावर कृष्ण त्याला म्हणतो, “पुढे वळलास की तुझं घर येईल. तेव्हा तू जा.”

त्यावर अगदी सहज कानजीभाई त्याला घरांपर्यंत सोडायची विनंती करतो.

त्यावर हसून कृष्ण म्हणतो; “ मी फक्त रस्ता दाखवतो. त्यावर जायचं की नाही, कसं जायचं हे ज्यांच त्याने ठरवायचं”

जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर स्वत:ची भूमिका मार्गदर्शकापुरतीच सीमित ठेवू इच्छितो तिथे आपण पामर पालकांची काय बिशाद !


29 views0 comments

Recent Posts

See All