Search
  • leena dhawan

पालकत्वाची सत्ता?!


“Frog is a Reptile??” एक खूपच गहन प्रश्न घेऊन माझी दोन्ही मुलं माझ्याकडे आली होती ( वयं वर्षे 4 1/2 आणि 3)

“नाही”- मी म्हटलं

“ मग?” लगेच पुढचा प्रश्न तयारचं होता.

आता zoology सोडून बरीच वर्षे झाली आहेत, तेव्हा Google करून म्हटलं “ Frog is an Amphibian”

“No it’s a Reptile “ कुठल्याशा कार्यक्रमामधल्या कुठच्यातरी character ने त्यांना आधीच enlighten केलेले होते, त्यामुळे त्यांचाजन्मदात्रीवर विश्वास बसणं जरा कठीण होतं.

“Frog is an Amphibian only... trust me. मोठ्या माणसांचं ऐकावं बेटा! “ - पुढचे प्रश्न चुकवण्यासाठी मी माझे ठेवणीतले हत्यारउपसले.... पण त्याचा काही फारसा परिणाम दिसत नव्हता.

“You don’t know it Muma” धाकट्याने अभिप्राय दिला. आता मात्र हद्द झाली होती. त्यांनी जणू माझ्या डिग्री लाच challenge केले होते.

“ Reptile कसे असतात? “ - मी विचारलं.

“ scaly body.. they walk on 4 legs or slitter” दोघांनीही ज्ञान पाजळलं.

“ frog has moist body and he breaths with lungs on land and with gills in water. That’s why he is an amphibian only “

माझा पहिलाच मुद्दा त्यांना पटल्यासारखा वाटला आणि “ Dadda Frog amphibian आहे” अशी बातमी घेऊन दोघे त्यांच्या वडिलांकडेपळाले और पप्पू पास हो गया!

ह्या घटनेने फक्त माझ्या zoology च्या ज्ञानावरची धूळ झटकली नव्हती तर माझा पालकत्वा बाबतचा दृष्टिकोनही बदलण्यास भागपाडले होते. जेव्हा मी ह्या घटनेच्या संदर्भातून पालकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेकडे बघू लागले तेव्हा मला पुलंचे एक वाक्यआठवले ... “गप्प बसा” संस्कृतीने जेवढे आपल्या समाजाचे नुकसान केले आहे तेवढे इतर कुठच्याही गोष्टीने केले नसावे.

ह्याच मानसिकतेचं पुढचं रूप म्हणजे “ मोठ्या माणसांचं ऐकले पाहिजे” हा epic dialogue.... वापरून वापरून अगदी गुळगुळीतझालेला!!

हया वाक्यामागचा उद्देश कितीही चांगला असला तरी अनेकदा ह्या वाक्यामुळे रुजवलेली विचारसरणी समाजातील अनेक negativities ना सुद्धा कारणीभूत आहे असं मला वाटलं. उदाहरणार्थ, जीवनसाथी निवडताना आपसूकच निर्माण झालेलं family pressure... त्यातूनच मग घरातील मोठ्यांना दुखावता येत नाही म्हणून घेतलेले आणि आयुष्यभर चालवलेले न पटणारे निर्णय. घरातील लहानमुलांवर परिवारातीलच थोरल्यांनी केलेले लैंगिक अत्याचार आणि त्या मुलांनी त्याबद्दल बाळगलेले मौन ; ह्या मागे जशी लैंगिक विकृतीआहे तसाच वयामुळे निर्माण झालेला दबावही आहे. थोडा अजून पुढचा विचार केल्यावर वाटलं की ह्या विचारसरणीचा प्रभाव फक्तघरेलू बाबतींपुरता मर्यादित नाही आहे. Seniors नी केलेले ragging चुकीचे असूनही त्याला routine म्हणून सहन करण्याची वृत्ती कादिसून येते? वशिलेबाजी, nepotism ह्यांमुळे खरे कर्तृत्व का डावलले जाते?? .... फरक इतकाच की वयाऐवजी पदाचे मोठेपणं इथेकामी येते. हेच कारण आहे की आपल्याकडे seniors च्या ideas ना challenge केले जात नाही.. बुद्धीला प्रमाण न मानता, वयालाआणि designation ला प्रमाण मानून जे आहे ते आणि आहे तसे accept करण्याची वृत्ती दिसून येते; कदाचित या चुकीच्या संकल्पनांनासंस्कृतीची लेबलं लावल्यामुळेच आपण बौद्धिक पात्रता असूनही नाविन्यपूर्ण कल्पनांमध्ये, संशोधनामध्ये पिछाडीवर आहोत. इतरदेशांतील लोकांबरोबर काम करताना हा सांस्कृतीक फरक जाणवतो आणि कदाचित भारतीय talent ला आकर्षितही करतो.

ही सगळी link जुळली आणि वाटलं पालकत्व ही कित्ती मोठी जबाबदारी आहे! आपले एक वाक्य एखाद्या व्यक्तिची आयुष्यभराचीविचारसरणी ठरवू शकते??? आणि जर असं असेल तर parenting मध्ये communication चा role खूप महत्वाचा आहे. मीmarketing communication मध्ये काम केल्यामुळे मला सगळ्यात मार्केटिंगची तत्व शोधण्याचा जणू छंद आहे. पालकत्वाकडे सुद्धात्यांच दृष्टीने बघताना आठवलं की communication science मध्ये एक तत्व आहे .... BELIEF LEADS BEHAVIOUR. जरग्राहकांची ब्रॅंडस् बाबतची निवड बदलायची असेल तर आधी त्याची विचारसरणी बदलावी लागते. आणि Communication कधीहीend results म्हणजे sales बद्दल बोलत नाही, तर ते फक्त behaviour change वर केंद्रित असतं ... पालकत्वाचही काहीसं तसचं आहेनाही का? आपण पालक आहोत मालक नाही ह्याचे भान असेल, तर आपसूकच आपण आपली भूमिका फक्त एका दिशादर्शकाचीआहे... योग्य आणि अयोग्य मधल्या फरकाची जाणीव करवून देणार्याची आहे .... थोडक्यात काय तर मुलांना प्रगल्भ बनवणारयाचीआहे, हे मान्य करू. End results मात्र मुलांनीच आपल्या बुद्धीने आणि तर्काने achieve करायचे असतात आणि अनुभवायचे असतात.

माझ्या बछड्यांनी शिकवलेला धडा चांगलाच लक्षात राहिला आहे. आता त्याच्याशी बोलताना खूप conscious असते. बदल ही काहीसोपी गोष्ट नाही; पण प्रयत्न चालू आहेत. अलीकडेच एक मराठी नाटक ( नकळत सारे घडले) पुन्हा पाहिलं आणि आता तर ते अजूनचंजवळचं वाटलं.... त्यातलंचं एक वाक्य माझ्या मनांत आता कायमचं कोरलं गेलयं, ते असं की ... “आपल्या अनुभवाचा पर्वत मुलांच्यापाठीशी उभा करायचा असतो; त्यांच्या वाटेत आडवा ठेवायचा नसतो.” पालकत्वाची ही सत्ता ‘न राबवण्यासाठीच’ असते नाही का ???

28 views0 comments

Recent Posts

See All