Search
  • leena dhawan

निरपेक्ष पालकत्व.. सुरुवात स्वावलंबी समाजाची


माझ्या दोन्ही मुलांना प्राण्यांचे वेड आहे. त्यामुळे प्राण्यांशी संलग्न असे अनेक कार्यक्रम आमच्या TV वर सतत चालू असतात. त्यांच्याप्रश्नांना समाधानकारक उत्तरे देता यावीत म्हणून घरी Nat Geo चा encyclopedia च आणून ठेवला आहे. त्यामुळे एकूणचप्राणीजगताबद्दल मला कुतुहल वाटू लागले आणि मी सुद्धा FB वर , YouTube वर त्यासंबंधी videos बघण्याचा सपाटा लावला. त्यातून अनेक मजेशीर गोष्टी कळल्या. आपल्या ducklings ना कोल्ह्यांपासून वाचवण्यासाठी मरण्याचे नाट्य वटवणारे mallard ducks, निरनिराळ्या hunting strategies लढवणारे octopus, आळीपाळीने पिल्लांचा सांभाळ करणारे penguins; हिंसक वाटणारेsharks आणि त्तरीही त्यांच्या बरोबर अगदी गोडीगुलाबीने राहणारे remora fish ह्या सगळ्यांचीच स्वत: ची अशी एक दुनिया आहे आणित्यांच्या जगाचे काही अलिखित नियमही आहेत असं वाटलं.

पण त्यापेक्षाही एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे, “ माणसांप्रमाणेच हे सगळे प्राणी आपल्या बाळांच्या सुरक्षिततेचीसगळी काळजी घेतात... त्यांच्या जन्मानंतर आळीपाळीने त्यांना सांभाळतात, सतत खाऊ घालतात आणि एक दिवस कुठलेही बंध नठेवता त्यांना त्याच्या जगतात मुक्तपणे प्रयाण करू देतात. ”

त्यांना आपल्याप्रमाणेच भावना आहेत, बुदधी आहे आणि काहींचा तर स्वत:चा समाजही आहे. पण एक गोष्ट त्यांना माणसांपासूनवेगळी करते आणि ती म्हणजे त्यांची “मुलांसाठी... पुढच्या पिढ्यांसाठी भविष्याची तजवीज ‘न करण्याची’ वृत्ती”. त्यामुळेच त्यांच्यातपालक म्हणून उपजतच निरपेक्षता असते, ज्याचा परिणाम म्हणून त्यांच्या पिल्लांमध्ये लवकर स्वावलंबनाची भावना दिसून येते.

मनुष्याच्या ह्या स्वभावाबद्द्ल विचार केल्यावर वाटलं, हेच कारण आहे की अजूनही आपल्या समाजात कित्येक जोडपी मुलगा, म्हणजेचतथाकथित वंशाचा दिवा जन्मावा म्हणून प्रयत्नशील असतात आणि त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी बिघडवतात. स्त्रीभ्रूणहत्येचीपाळंमुळं म्हणूनच तर आपल्याकडे रूजली आहेत.

हेच कारण आहे की आपल्या मुलांनी म्हातारपणी आपला सांभाळ करावा अशी सामान्यतः असलेली अपेक्षा पूर्ण न झाली की अनेकांनानैराश्य येतं.

आणि हेच कारण आहे की, मुलांना भविष्यात चांगल्या सुखसोयी देता याव्यात म्हणून आजच्या घडीला त्यांच्याबरोबर वेळ न घालवतां, पालक दिवसरात्र मेहनत करतात आणि कधीकधी प्रेमाला/वेळेला वस्तूंनी replace करू बघतात.

भ्रष्टाचार, nepotism ह्या आजकालच्या ज्वलंत समस्यांमागेसुद्धा आपल्या समाजात खोलवर दडलेली हीच तर वृत्ती आहे.

ज्ञानेश्वरीतील एक वाक्य एका लेखात वाचलं होतं...” दिवसभर सावलीत बसून संध्याकाळी सावल्या ओसरल्यावर आपापल्या गोठ्यांतपरतणार्या गायींबद्दल त्या झाडाची जेवढी अपेक्षा असेल, तेवढीच अपेक्षा माणसाने आपल्या मुलांकडून ठेवावी, जेणेकरुन आपले जीवनसुलभ होईल. प्राण्यांच्या जीवनातील एक नैसर्गिक आणि आपसूक गोष्ट माणसाला समजावण्यासाठी एक महात्मा लागतो ही कितीविसंगत गोष्ट आहे नाही का?

निसर्ग प्रत्येक जीवाला “fight or flight” म्हणजे लढण्याची किंवा बचावासाठी पळून जाण्याची क्षमता देतो. पण ह्या क्षमतेची ओळखपटायला मात्र प्रत्येकाला घरट्याची उब सोडून बाहेर पडावं लागतं. कदाचित मानव ही एकमेव प्रजाती आहे जी निसर्गाच्या ह्या देणगीबद्दल साशंक आहे आणि म्हणूनच स्वावलंबन शिकवण्यापेक्षा तजवीज करण्यावर आपला भर असतो.

अशाच विचारात FB वर scroll करताना एक खूप प्रेरक मुलाखत पाहिली - मराठी उद्योजक श्री. सुशांत फडणीस यांची. त्यात त्यांनीनमूद केलेली एक गोष्ट मला पटली... ती अशी की, पालकांनी आपल्या मुलांना थोडं दूर शिकायला किंवा व्यवसाय करायला पाठवलंपाहिजे. अशा ठिकाणी, जिथे त्यांना कोणी फारसं ओळखत नाही. मग त्यांना कुठलंही काम करायची लाज वाटणार नाही. ते स्वत: चीकाळजी घ्यायला तर शिकतीलच पण त्याच बरोबर माणसं ओळखायला आणि जपायला देखील शिकतील.

Jackie Chan चे एक प्रसिद्ध वाक्य आहे; ज्यात तो म्हणतो की, पालकांनी आपली संपत्ती वंशपरंपरेने देण्यापेक्षा वैचारिक धन मुलांनाद्यावे... तेच शाश्वत असते. ही परिपक्वता जगातील अनेक मान्यवरांमध्ये दिसून येते. आणि म्हणूनच Warren Buffet, Bill Gates, Mark Zuckerberg ह्यांनी त्याच्या गडगंज संपत्तीच्या वंशपरंपरागत वाटचालीला छेद देऊन, मुलांना स्वावलंबी करण्यावर भर दिलाआहे.

असं “निरपेक्ष” पालकत्व जर सामान्य माणसाला शिकता आणि प्रत्यक्षात उतरवता आलं तर आयुष्य खूप साधं आणि सरळ होईल. मगकदाचित आपण एक स्वावलंबी, जबाबदार आणि मानसिकदृष्ट्या सबळ पिढी समाजाला देऊ शकू.

शेवटी काय.. खरं प्रेम उडण्यासाठी पंख देतं, घरट्याशी बांधून ठेवत नाही...14 views0 comments

Recent Posts

See All