Search
  • leena dhawan

नतमस्तक करणारी दिवाळी

कधी कधी मुलं खेळण्यांसाठी खूपच हट्ट धरून बसतात. “ we want more toys” म्हणून मागे लागतात. मग एकदा त्यांना मिडासराजाची गोष्ट सांगितली आणि म्हटलं, तो राजा “more gold ... more gold” म्हणून हट्ट धरून बसला होता आणि त्याच्या ह्या“greedy” स्वभावामुळे त्याची मुलगीपण gold ची झाली. म्हणून जे आहे त्यात happy आणि thankful असलं पाहिजे. Otherwise मम्मा पण एक दिवस toy बनून जाईल.

तेव्हापासून मोठ्या मुलाचा तरी “more toys “ चा हट्ट कमी झाला. पण माझी ही गोष्ट मलाच सांगून तो मला समज देईल अशी मीकल्पना केली नव्हती.

झालं असं की दिवाळी म्हणजे काय? त्यावेळी कुठचे कुठचे दिवस साजरे करतात हे मी मुलांना सांगत होते. बोलता बोलता म्हटलं, “ आज धनत्रयोदशी आहे. So we will prey to goddess Laxmi and she blesses us with more money and prosperity “

त्यावर तो म्हणाला, “ don’t we have money? “

“आहे रे पण...” मी अडखळले.

त्याची पुढची comment तयारच होती..” then are you greedy for more money? “

मी चमकले. वाटलं की, प्रत्येक सण आपल्याला विविध देवतांबाबत,निसर्गाबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतो. पण त्याचंरुपांतर हळूहळू नवसासायासात किंवा फक्त झगमगाटात कधी होतं आपलं आपल्यालाच कळत नाही आणि आपण rituals मध्येचगुरफटून राहतो.

माझ्या मुलाच्या त्या उद्गारांनी माझी पुजेकडे, देवाकडे पाहायचा नजरिया बदलला आणि एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली. तीअशी की, मुलांना शालेय अभ्यास, चांगले manners, चांगले सामाजिक संस्कार शिकवण्याबरोबर समाधान, कृतज्ञता ह्या भावना सुद्धासमजावणे आणि आपल्या कृतीतून दर्शवणे गरजेचे आहे.

सध्याच्या स्पर्धेच्या युगात, जेव्हा करिअरच्या, lifestyle च्या मागे धावताना आपला शारिरीक किंवा मानसिक तोल ढळतो, तेव्हा हेचसमाधान आपल्याला मन:शांति देऊ शकतं. आयुष्याचा जमाखर्च मांडताना न मिळवू शकलेल्यावगोष्टींबद्दल दु:ख करत बसण्यापेक्षा जेकमावलं त्याबद्दल आणि ज्यांच्या साथीने मिळालं अशांबद्दल कृतज्ञ राहण्याची परिपक्वता ह्याच शिकवणीतूनच तर येते.

ह्या दिवाळीच्या प्रत्येक पूजनात फक्त आणि फक्त नतमस्तक झाले. No wonder this was the happiest Diwali ever!!!


9 views0 comments

Recent Posts

See All