Search
  • leena dhawan

तुझ्यावर भार माझा…

आम्ही हनिमूनला ग्रीसला गेलेलो तेव्हा तिथे अनेक परदेशी tourists ना बघितलं होतं. आपल्या लहानग्यांना मस्तपैकी बाबागाडीतबसवून, हातात काहीतरी चोखायला किंवा खेळायला देऊन भटकंतीला निघालेल्या जोडप्यांना पाहिलं की, “आपल्या मुलांना पण खूपफिरवायचं बरं” असं मनाशी निश्चित केलं होतं.

ठरवल्याप्रमाणे मुलांबरोबर ( वय वर्षे ४ आणि ६) दरवर्षी विविध ठिकाणी जातो पण त्या सहलीमधे आणि हल्लीच केलेल्यामॅारिशसच्या सहलीत फरक असा का ह्यावेळी मुलांची संपूर्ण जबाबदारी माझ्या एकटीवर होती. आणि मुळातच मी जरा जास्तच panic होते त्यामुळे मुलांआधी स्वतःला manage करायचं खूप pressure जाणवत होतं.

सहलीची सुरूवात छानच झाली आणि जमतंय की आपल्याला असा विश्वास वाटू लागला.

मुलंही जोशात होती त्यामुळे schedule प्रमाणे वागणं सोप्पं जात होतं.

Casela bird park ला आलो आणि त्यांच्या कानात जणू वारंचं शिरलं. तेवढ्यातच वीणा वर्ल्ड च्या tour manager प्रशांतनेsurprise ची घोषणा केली आणि मुलांचा उत्साह ओसंडून वाहू लागला.

प्रशांतरावांचा विजय असो! म्हणत surprise बघायला गेलो आणि ती Gold coaster ride पाहून आईने तलवार म्यान केली. पणतिला माघार घेऊ द्यायची नाही असा चंग सहप्रवाशांनी बांधला होता आणि ती कशीबशी तयार झाली.

माझा एक किल्ला सर झाला आणि आम्ही दोघींनी एकेक पिल्लू घेऊन बसायचं निश्चित केलं.

पण जोपर्यंत माझे parenting skills चारचौघात पणाला लागत नाहीत तोपर्यंत माझ्या मुलांना मजा येत नाही. त्यामुळे आम्ही दोघेहीमम्मा बरोबरच बसणार असा घोषा त्यांनी लावला.

आईला जणू निमित्तच मिळालं.

तूच कर ती ride दोनवेळा असं म्हणत तिने सुटकेचा एक प्रयत्न करून पाहिला.

पण मीसुद्धा अशी सहजासहजी माघार घेणारी नव्हते.

मी माझा रामबाण बाहेर काढला.

म्हटलं हे बघा, मला खूप भीती वाटतेंय आणि आजी खूप वयस्क आहे तेव्हा आम्हाला दोघींना मदतीची गरज आहे. कोण कोणाला मदतकरणार हे तुम्ही दोघं मिसळून ठरवा आणि मला सांगा.

जबाबदारी आली की मुलांचा approach खूप बदलतो. दोघांचा निर्णय झाला आणि मोठ्याने आजीची व धाकट्याने माझी जबाबदारीघेतली आणि निभावली सुद्धा.

आणि त्यांना तसं वागताना बघून माझी कॅालर ताठ झाली हे काही वेगळं सांगायला नको15 views0 comments

Recent Posts

See All