Search
  • leena dhawan

चोलुटेका, डार्विन आणि मुलं


प्रकाश अय्यर ह्यांचा The bridge on the river Choluteca हा लेख वाचला होता, काल पुन्हा एकदा त्यावरचे एक podcast ऐकलंआणि कुठेतरी दिलासा मिळाला. ज्यांनी हा लेख वाचला नसेल त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात सांगते. चोलुटेका ह्या मध्य अमेरिकेतील नदीवर ४८४ मीटर्स लांबीचा एक प्रशस्त पूल बांधण्यात आला .. त्याचे लोकार्पण झाले आणि लवकरचतो पूल एक अभिमानाचा विषय बनला. ज्याठिकाणी तो बांधला होता तिथे अनेक वादळे येतंच असतात. एके वर्षी एक प्रचंड वादळ आलं आणि पुलाचा काही हिस्सा तर तुटलाच पण मुख्य म्हणजे नदीचा प्रवाह बदलला. अजूनही तो पूल शाबूत आहे but it’s a bridge over nothing and to no where.


लेखकाने ह्या पुलाची तुलना कोविडशी केली होती आणि एक विचार मांडला की नवीन challenges वर जर नवीन उपाय शोधण्यास आपण असमर्थ ठरलो तर आपणही ह्या पुलाप्रमाणेच असू… so let’s build ourselves to ADAPT and not just to LAST. डार्विनच्या“survival of the fittest” ह्या theory मागेही हाच दृष्टिकोन आहे. Fit = THE ADAPTIVE ONE and not THE STRONGEST ONE. गेल्या काही दिवसांपासून कोविडच्या “शिक्षणावरील प्रभावावरून” खूप discussion चालू आहे. Virtual schooling सुरू करून आपण survive करायचा शक्यतो प्रयत्न करत आहोत पण हे काही १००% लोकांपर्यत पोहोचणारे solution नाही. त्यात भर म्हणून की काय“कोविडबॅच” ह्या टॅगने धुमाकूळ घातला आणि मुलांच्या तसेच पालकांच्या चिंतेत भर पडली. Economist म्हणताहेत की ह्याचे दुष्परिणाम पुढची दहा वर्षे तरी दिसतील. ह्या सगळ्या गोष्टी भीतीचा बागुलबुवा निर्माण करतात तेव्हा वाटतं; science च्या नियमांप्रमाणे मधमाशी (bumblebee ) सुद्धा उडू शकत नाही पण ती उडतेच की.. कारण तिला हा नियम माहीतच नसतो. अज्ञानात सुख असते म्हणतात ते हे असे… तसंच प्रत्येक गोष्ट सुरुवातीला कठीणच वाटते की .. अगदी दोनाचा पाढा सुद्धा. पण ज्याला पाढा येत नाही पण calculator वापरता येतो त्याचं कुठे अडतं? त्यादिवशी एका नातलगाच्या मुलीला एका अत्यंत प्रतिष्ठित फॅशन डिझायनरकडे internship मिळाली. त्यासाठी तिने अनेक tests दिल्या होत्या. त्यात एक test अशीही होती की submission च्या एक तास आधी त्यांनी brief बदललं आणि वेळ कमी केला. एका वर्षी CAT ह्या स्पर्धापरीक्षेसाठी सुद्धा नेहमीसारखे तीन नव्हे तर पाच पेपर आले होते. अशा सगळ्यावेळी एकच गोष्ट पारखली जाते ती म्हणजे कोण panic होतंय…. कोण frustrate होतंय आणि कोण adapt होतंय. ह्या सगळ्या गोष्टींकडे प्रकाश अय्यरांच्या “चोलुटेका” angle ने बघून एक विचार मनात आला की ह्यातून तरून जी मुलं पुढे जातील ती कदाचित जास्तीत जास्त adaptable असतील.. निडर असतील. ही मुलं employers च्या so called विशेषणांची पर्वा करणारच नाहीत. ते त्यांचा मार्ग शोधतील आणि इतरांना मार्ग दाखवतील सुद्धा. तेव्हा मुलांना ह्या घटनेकडे सकारात्मकतेने, दूरदृष्टिने बघायला शिकवूया. मार्क्स, ग्रेड ह्यापलीकडे जाऊन situation handling चा हाधडा त्यांना गिरवायला लावूया आणि त्याचबरोबर पालक म्हणून आपणही संयमाचा पाठ शिकूया.

1 view0 comments

Recent Posts

See All