Search
  • leena dhawan

गूळ- चपाती

उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागले (मुलं खूप लहान आहेत हे सगळं समजायला, त्यामुळे हे मला लागलेले वेध आहेत) आणि कुठे जायचं त्याबद्दल

विचारविनिमय सुरू झाला.

नव-याचं schedule जरा busy होतं आणि Mother’s Day चं निमित्त झालं आणि मी, आई आणि दोन मुलं असं जायचं नक्कीझालं.

थोड्याफार research नंतर मॅारिशस हे destination निश्चित केलं आणि दोन मुलं, senior citizen ही बरोबर म्हणून माझ्यातल्यामराठी माणसाने विश्वासाचा travel partner निवडला… वीणा वर्ल्ड!

“बापरे! daring आहे तुझ्यात… एवढ्या लहानग्यांना घेऊन चालली आहेस आणि ते पण नव-याशिवाय ? वगैरे वगैरे ऐकून माझंअवसान गळत चाललं होतं.

पण खरं सांगू का? परिस्थिती आली ना की मुलंही जबाबदारीने वागतात आणि माझंही Parenting Skill कसं आहे तेही test करूनबघायची ही संधी होती.

म्हणून “तुम्ही दोघे आम्हा दोघींना घेऊन चालला आहात” असं त्यांच्या मनात पक्कं केलं आणि आमची वरात निघाली.

प्रवास उत्तम झाला आणि मॅारिशसला उतरलो. Group बरोबर असल्यामुळे comfortable वाटत होतं. मुलांना परक्या देशात दादा-ताई, काका-काकू, आजी -आजोबा मिळाले होते आणि त्यांच्या बरोबर त्या सगळ्यांनीच E-i-e-i-oooooo चा ताल धरला आणि मीनिर्धास्त झाले.

एक दोन दिवस मजेत गेले . Luxurious resort मधे खाण्यापिण्याची चंगळ होती, पण आपण भारतीय international cuisine चाआस्वाद घेताना “चपाती-भाजी” आठवून हळहळतोच की!

शेवटी एकदाचे आम्ही “नमस्ते” नावच्या एका Indian restaurant मध्ये आलो आणि ओळखीचा मेनू पाहून सुखावलो.

“आज बटर चिकन आणि बटर नान मनसोक्त खायचं” असं ठरवलं.

पण पालकांना हुश्श वाटलं की मुलांना ते कळत असावं कदाचित म्हणूनच की काय माझ्या धाकट्याने ठेवणीतला स्वर काढला आणि “ I don't want this. Get me गूळ-चप्पा only” असा तगादा लावला.

आईने त्याला ice cream ची लालूच दाखवली.. मी सुद्धा बाबापुता करून पाहिलं. पण तो ऐकेचना.

खरं तर दोन धपाटे घालायला हात शिवशिवत होते पण त्यानंतरचा episode खूप भयानक झाला असता. म्हणून दीर्घ श्वास घेतलाआणि भावनांना आवर घातला.

मला अचानक आठवण झाली ती मी हल्लीच केलेल्या एका vlog ची. Biggest Parenting Mistake हा तो vlog होता आणि त्यातparenting expert ने एक tip सांगितली होती.

जी गोष्ट आपण मुलांना प्रत्यक्षात देऊ शकत नाही ती त्यांना fantasy मधे द्यायची असते- अशी ती trick होती.

आज ती trick प्रत्यक्षात वापरून पाहायची वेळ होती.

फुरंगटून बसलेल्या धाकट्याला जवळ घेतलं आणि म्हटलं… गूळ आणि चप्पा हवी? गरम गरम ? वर तूप घालून? yummy yummy वाली?

बरोबर वरण भात? की तूप साखर भात?

तूप साखर भात—- तो पुटपुटला.

हम्म् ! तू share करणार का पण माझ्याबरोबर? मी त्याला बोलतं करत म्हटलं

Yessss… but I want a story also- त्याने त्याची condition ठेवली.

मी तर आज दोन stories सांगणार आहे पण गूळ चपाती मात्र मुंबईत गेल्यावर देऊ शकते. पक्का promise!

आमची deal पक्की झाली आणि मुलं नीट जेवली.

मी सुटकेचा निःश्वास टाकला आणि यापुढे जगात कुठेही गेले तरी एक गुळाची डबी बरोबर ठेवायची खूणगाठ मनाशी पक्की केली.

Biggest Parenting Mistake| Parenting tips https://youtu.be/FBI9nVoTslU

25 views0 comments

Recent Posts

See All