Search
  • leena dhawan

कुटुंबातील सगळ्यात महत्वाची व्यक्ति कोण ??अगदी परवाचीच गोष्ट, माझी family आणि आईची family गणपतीपुळेला पिकनिकसाठी गेलो होतो. मुलं मस्त enjoy करत होती... मनसोक्त खातपित हुंदडत होती. तेवढ्यात कुठेतरी माशी शिंकली आणि काहीतरी घेऊन देण्यासाठी आम्ही गाडी थांबवली नाही म्हणूनरुसवे-फुगवे चालू झाले. आणि मग मुलांना normal करण्यासाठी सुरू असलेली आम्हां नवजात पालकांची धडपड आई शांतपणेपाहात होती.

थोड्या वेळाने मी एकटी आहे असं बघून आई म्हणाली; “काहीतरी चुकतंय असं नाही वाटत तुला? आम्ही सुद्धा मुलं सांभाळली आणिwe have done a fairly good job ; पण आम्ही मुलांपुढे हतबल नव्हतो”

आई तिथून निघून गेली पण तिने उभा केलेला प्रश्न काही केल्या मनातून जाईना.

खरंच काहीतरी चुकतंय हे कुठेतरी पटत होतं. एवढी एवढीशी मुलं पण भर समारंभात पालकांना वेठीस धरतात, भरमसाठ खेळणीअसूनही समाधानी वाटत नाहीत. बरं मागितलेली गोष्ट घेऊन दिली तरी त्याचे त्यांना अप्रूप वाटत नाही. एका research प्रमाणे, पन्नासवर्षांपूर्वी पालक जेवढा वेळ मुलांना देत होते त्यापेक्षा आत्ताच्या माता मुलांबरोबर जवळजवळ दुप्पट तर वडील जवळजवळ चौपट जास्तवेळ घालवतात.

मग काय बरं गफलत होतेय?

माझ्या back of the mind कुठेतरी हा विचार चालू होता आणि John Rosemand ह्या एका parenting expert ने लिहिलेल्याएका article वर माझी नजर पडली. त्या लेखाचा आशय होता की, आत्ताच्या पालकांच्या मते मुलं हा घरातील सर्वात महत्वाचा घटकआहेत आणि बर्याचदा पालक त्यांना स्वत:हून जास्त priority देतात. ही priority किंवा हा status मुलांनी कमावलेला नसतो तरत्यांना तो काहीही न करता अगदी

सहज मिळालेला असतो. त्यामुळे “जबाबदारी” समजण्याआधी त्यांना “हक्क “ समजतात आणि ते स्वयंकेंद्रित बनतात.

जबाबदार व्यक्ति हीच सगळ्यात महत्वाची व्यक्ति असते; जसं army मधे general किंवा corporate मधे CEO; ही जाणीवमहत्वाची आहे.

पालक मुलांना career goals साठी हरतर्हेने तयार करू इच्छितात पण एक समाजाभिमुख व्यक्ति म्हणून मुलांची जडणघडण करणं हीत्याची priority नसते. आणि इथेच गफलत होते.

John Rosemand ह्यांचे हे विचार अंतर्मुख करणारे होते. कधी कधी मुलांचं वागणं बघून, “ आमच्या वेळी असं नव्हतं” असं सहजचजुन्या काळचा आज्जीसारखं बोलून जायला होतं. वाटतं काळ बदलला, सुबत्ता आली... गरजा बदलल्या तेव्हा पालक म्हणून वागणूकही बदलणारंच. पण चांगल्या - वाईटाच्या परिभाषा थोड्याफार फरकाने अजूनही त्याच आहेत. तेव्हा जुन्या गोष्टींना खड्यासारखंबाजूला काढण्याऐवजी त्यातलं सोनं वेचायला काय हरकत आहे??

0 views0 comments