Search
  • leena dhawan

“कास” निसर्गाची


अलीकडेच कास पठाराला जाणं झालं. मुलं पहिल्यांदाच गाव बघत होती; त्यामुळे हिरवीगार शेतं, ऊसाचे मळे, चरणारी जनावरं बघूनत्याच्या कानात जणू वारं भरलं होतं. आम्हाला सुद्धा ब-याच दिवसांनी ब्रेक मिळाला होता आणि सगळा परिवार बरोबर होता तेव्हागप्पांना उत आला होता.

बोगद्याच्या गणपतीकडून कासचा रस्ता धरला आणि निसर्गाचं ते विशाल रुप डोळ्यात आणि मोबाईलच्या कॅमेरात साठवून घेण्याचाआटोकाट प्रयत्न सुरू झाला.

सह्याद्रीचे उंचच उंच कातीव कडे, हिरवगार झालेलं माळरान, कुठे कारळाच्या फुलांचे पिवळेधम्मक गालिचे तर कुठे रानफुलांचे जर्दगुलाबी तुरे आणि कुठे कुठे फक्त विविध रंगाचा चमकणारा कातळ…. आणि ह्या सगळ्याचा मनमुराद आस्वाद घेत, भटकत चरणारीगुरं.

कासला पोहोचण्याच्या आधीच एवढं सौंदर्य बघितल्यामुळे कासच्या पठाराबाबत आमची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

कुटुंबातले सगळे फोटोग्राफर सज्ज झाले आणि आम्ही पठारावर प्रवेश केला. छान ऊन पडलं होतं … हिरवंगार पठार आल्हाददायकवाटत होतं पण दूरदूर पर्यंत फुलांचे ताटवे काही दिसत नव्हते. थोडावेळ फेरफटका मारला आणि जरा खट्टू होऊनच गाडीकडे परतलो.

एके ठिकाणी चहा घ्यावा म्हणून थांबलो … आमच्या जवळच काही स्थानिक मंडळीही होती. गप्पा सुरू झाल्या… आणि आम्हीकासच्या पठाराचा अनुभव त्यांना सांगितला. त्यातले एक आजोबा हसले… म्हणाले.. “दीदे अगं त्याचं असं हाय की, आधी गुरं ढोरं तिथंचरायची.. त्यांचं शेण तिथं पडायचं आणि फुलं फुलायची… आता तिथं कोणालाबी जाऊ दी ना मंग कसलं खत आणि कसली फुलं! त्यो बग डोंगर त्यावर किती फुलं हायती. तुमी जास्त राखाया ग्येलात की असंच होतया”

त्या बाबांच्या गावरान उद्गारांमागे लपलेलं सत्य मला अंतर्मुख करून गेलं. जे त्या फुलांच्या बाबतीत झालं तेच अनेकदा मुलांच्याबाबतीतही होतं नाही का?

जितकं जपावं तितकी मुलं पंगू होत जातात… शारिरीक विकासाबाबतीत, सवयींच्या बाबतीत आणि मानसिक विकासाच्या दृष्टीनेसुद्धा.

लागू देऊया की त्यांना थोडी ठेच, त्यांच्या भावनांचा आदर निश्चितच करूया पण त्यांचं उत्तर चुकीचं वागणं किंवा tantrums दाखवणेनाही तर समस्येच्या मुळाशी जाऊन तोडगा शोधणं आहे ह्याची जाणीव त्यांना करून देऊया. आणि हा तोडगाही त्यांचा त्यांनाचशोधायचा आहे बरं का हे ठसवून देऊया!

अगदी हाताशी असलेलं फळ तोडण्यापेक्षा निरनिराळ्या युक्त्या लढवून पाडलेले फळ जरा जास्त गोड लागतं हे त्यांनाही अनुभवू दे. तावून सुलाखून निघतील ती … मग कदाचित जास्त सज्ज होतील आणि ख-या अर्थाने बहरतील.

16 views0 comments

Recent Posts

See All